Washim: बेपत्ता करोनारुग्णाचा मृतदेह आढळला विहिरीत

वाशिमःरुग्णालयातून पळालेल्या करोनाबाधित रुग्णांचा मृतदेह विहरीत सापडल्यानं एकच खळबळ माजली आहे. वाशिममध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून रुग्णालयातून करोनाबाधित रुग्ण गायब झालाच कसा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

२९ जुलैला रुग्णालयातून करोनाबाधित रुग्णानं पळ काढला. बऱ्याच ठिकाणी शोधा शोध करूनही रुग्णांचा काहीच तसाप लागत नव्हता. अखेर पोलिसांनी त्यांच्या मोबाईल नंबर ट्रेस केला. मोबाईल वरून रुग्णाचा ठावठिकाणा शोधून काढल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. तेव्हा एका विहिरीच्या बाजूला त्याचा फोन व त्याचे सामान सापडले.

वाचाः लॉकडाऊन सातत्याने वाढवणं योग्य नाही: नितीन गडकरी

पोलिसांनी रुग्णांच्या नातेवाईकांना बोलावून विहिरीलगत सापडलेल्या वस्तूंची ओळख पटवून घेतली. ओळख पटल्यानंतर पोलिसांनी अधिक शोधाशोध केल्यानंतर विहरीत मृतदेह असल्याचं आढळून आलं. या रुग्णानं आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज वाशिम पोलिसांनी व्यक्त केला आहे.

वाचाः राज्यात आज १०३२० नवे बाधित; अडीच लाखांवर रुग्ण करोनामुक्त

याआधीही कोव्हिड केअर सेंटरमधून अनेक रुग्ण बेपत्ता झाल्याचं उदाहरण समोर आली होती. तर, करोनाला घाबरुन अनेकांनी आत्महत्या केल्याच्या घटनाही घडत आहे. करोनाबद्दल लोकांच्या मनात असलेल्या भीतीमुळं हे प्रकार घडत असल्याचं सांगितलं जातं आहे. मात्र, करोनावर योग्य उपचार घेतल्यास बराही होऊ शकतो, असं वेळोवेळी प्रशासनाकडून सांगण्यातही येत आहे. तरी सुद्धा अजूनही काही भागांत करोनाबद्दलची भिती मनात बाळगली आहे.

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment