Nagpur Crime: वडिलांची हत्या करून मृतदेह रस्त्यावर फेकला; परत घरी आला आणि…

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

अविनाश महाजन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Nov 2020, 10:32:00 PM

नागपूर:धारदार शस्त्राने वार करून वडिलांची हत्या केल्यानंतर मृतदेह रस्त्यावर फेकला. त्यानंतर निर्वस्त्र होऊन मारेकरी मुलाने जेवण केले. काळजाचा थरकाप उडवणारी ही घटना एमआयडीसीतील अमरनगरमधीलपालकर ले-आऊटयेथे आज रात्री ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.सम्राट रंगारी(वय ५८), असे मृत व्यक्तीचे नाव आहे तरसिकंदर रंगारी(वय २७), असे मारेकरी मुलाचे नाव आहे. सम्राट हे एमआयडीसीतील कंपनीत कामाला होते.Nagpur Crime Latest NewsUpdates )

वाचा: नागपूर: शवविच्छेदनगृहातून मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास, नर्सवर संशय

सिकंदर व सम्राट हे दोघेच घरात होते. सिकंदर याने किरकोळ कारणावरून सम्राट यांच्यासोबत वाद घातला. त्यातून संतप्त झालेल्या सिकंदर याने धारदार शस्त्राने सम्राट यांच्यावर सपासप वार केले. त्यातच गंभीररित्या जखमी होऊन सम्राट यांचा मृत्यू झाला. त्यानंतर निर्दयी सिकंदरने सम्राट यांचा मृतदेह फरफटत घराबाहेर आणला आणि तो रस्त्यावर फेकला.

वाचा: पुण्यातून बेपत्ता झालेले प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर अखेर ‘इथे’ सापडले

सिकंदर त्यानंतर परत घरीत आला. त्याने दरवाजा बंद केला व अंगावरील सर्व कपडे काढून तो जेवायला बसला. दरम्यान, रस्त्यावर मृतदेह बघून परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. एका नागरिकाने एमआयडीसी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच नागपूर एमआयडीसी पोलीस व गुन्हे शाखा पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. सम्राट यांच्या घराचा दरवाजा बंद होता. दरवाजा तोडून पोलीस घरात गेले असता सिकंदर हा विवस्त्र असल्याचे तसेच त्याच स्थितीत जेवत असल्याचे पाहून पोलीसही हादरले.

दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. सिकंदर हा मनोरुग्ण असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

वाचा: धक्कादायक! इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळले; पत्नीला अटक

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

Pravin Darekar: ठाकरे सरकार करणार भाजप नेत्यांची चौकशी?; दरेकरांनी दिले ‘हे’ प्रत्युत्तर महत्तवाचा लेख

Web Title : nagpur horror youth stabs father to death
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

हेही वाचा

  • देशकाही निर्णयांमुळे न्यायालयाचा हस्तक्षेप वाढल्याचं दिसतंयः उपराष्ट्रपती
  • विज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीची मोठी ऑफर; भरघोस ऑफर्ससह सेटटॉप बॉक्स मिळवा फ्री
  • देशशिवसेनेला अॅलर्ट? हैदराबाद मनपा निवडणुकीत भाजप झलक दाखवणार!
  • मुंबई’ठाकरे सरकारकडून मराठा विद्यार्थ्यांचा विश्वासघात; आता कायदेशीर लढाई लढणार’
  • अहमदनगरगावात बिबट्याची दहशत; पण या विभागाला झाला फायदा
  • क्रिकेट न्यूजIndia vs Australia : रोहित शर्माची फिटनेस टेस्ट नेमकी होणार तरी कधी, जाणून घ्या तारीख..
  • विदेश वृत्तकरोना: चीनमध्ये सर्वसामान्यांसाठी लस तयार? परवानगीसाठी केला अर्ज
  • क्रिकेट न्यूजसचिन तेंडुलकर रस्ता विसरला; मुंबईच्या रिक्षा चालकाने केली अशी मदत, पाहा व्हिडिओ
  • क्रिकेट न्यूजIndia vs Australia : रिषभ पंत आणि वृद्धिमान साहा यांच्यापैकी कोणाला संधी मिळायला हवी, सौरव गांगुली म्हणाले
  • मोबाइलOppo Reno 5 सीरीजमध्ये लाँच होणार तीन स्मार्टफोन, समोर आले डिटेल्स
  • मोबाइलसॅमसंग Galaxy A02S आणि Galaxy A12 लाँच, पाहा किंमत-फीचर्स
  • बातम्या’असे’ करा कार्तिकी एकादशी व्रत; पाहा, अद्भूत योग व मान्यता
  • मोबाइलiPhone 12 Pro आणि 12 Pro Maxची अपेक्षेपेक्षा जास्त डिमांड, जबरदस्त विक्री
  • ब्युटीथंडीत करावा बॉडी मसाज, आयुर्वेदानुसार कोणते तेल वापरल्यास मिळतील जास्त लाभ?

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment