Nagpur Blast: नागपूरजवळच्या बेला येथील साखर कारखान्यात स्फोट; ५ कामगार ठार

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

अविनाश महाजन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 01 Aug 2020, 06:57:00 PM

नागपूरजवळच्या साखर कारखान्यात स्फोट, ५ जण ठार

Subscribe Us On

सर्वाधिक पाहिलेले व्हिडीओ

नागपूर:नागपूरजवळच्याबेलायेथीलमानस अॅग्रोप्रायव्हेट लिमिटेड साखर कारखान्यात बायोगॅसच्या टाकीत स्फोट होऊन पाच कामगार ठार झाले आहेत. ही भीषण दुर्घटना घटना आज दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. या स्फोटाने कारखान्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. (Nagpur Sugar Factory Blast)

वाचा: सांगली: लॉकडाउनचा बळी; आर्थिक विवंचनेमुळे एसटी मेकॅनिकची आत्महत्या

मंगेश प्रभाकर नौकरकर (वय २१) , लीलाधर वामनराव शेंडे (वय ४७), वासुदेव विठ्ठल लडी (वय ३०), सचिन प्रकाश वाघमारे (वय २४) व प्रफुल्ल पांडुरंग मून (वय २५ ) अशी मृतांची नावे आहेत. हे सर्व जण वडगाव येथील रहिवाशी असल्याने गावावर शोककळा पसरली आहे.

वाचा: पोलिसांसमोरच कथित गो-रक्षकांकडून तरुणाला हातोड्यानं बेदम मारहाण!

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पाचही जण कारखान्यात काम करीत असतानाच अचानक स्फोट झाला. स्फोटानंतर कामगारांमध्ये एकच खळबळ उडाली व गोंधळ निर्माण झाला. स्फोटात पाच जण गंभीररित्या जखमी झाले होते. या जखमींना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता डॉक्टरांनी तपासून पाचही जणांना मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच नागपूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक राकेश ओला, उपअधीक्षक संजय पुरंदरे, स्थानिक गुन्हेशाखेचे निरीक्षक अनिल जिट्टावार यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बेला येथे धाव घेतली. स्फोट नेमका कशामुळे झाला याचा तपास पोलीस करीत आहेत.

वाचा: सुशांतच्या वडिलांनी मागणी केली तर CBI चौकशी शक्य : नितीश कुमार

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Sushantsingh Rajpaut Suicide: ईडीने किमान एवढी कारवाई करावी-फडणवीस महत्तवाचा लेख

Web Title : blast in nagpurs manas agro sugar factory 5 workers died
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

हेही वाचा

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment