Kulvindar Singh Kapur घात की अपघात; MMRDA संचालक कुलवेंद्र सिंह यांचा चौथ्या मजल्यावरून कोसळून मृत्यू

मुंबई:मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) संचालक (प्रणाली)कुलवेंद्र सिंह कपूरयांचे चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून कोसळून निधन झाले असून हा अपघात आहे, आत्महत्या आहे की घातपात याचा तपास पोलीस करीत आहेत. ही घटना शुक्रवारी रात्री ९:३० वाजताच्या सुमारास घडली. घटना घडली तेव्हा घरामध्ये त्यांची पत्नी आणि २५ वर्षीय मुलगा होता. (MMRDA DirectorKulvindar Singh Kapur Death )

वाचा: महापौरांवर कोसळला दु:खाचा डोंगर; मोठ्या भावाचे करोनाने निधन

कुलवेंद्र सिंह कपूर (५५) हे वांद्रे कुर्ला संकुलातील एका इमारतीत कुटुंबीयांसह वास्तव्याला होते. चौथ्या मजल्यावरील फ्लॅटमधून ते काल रात्री कोसळले आणि एकच खळबळ उडाली. कुलवेंद्र सिंह हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे पाहून सुरक्षा रक्षकाने तातडीने सर्वांना कल्पना दिली. त्यानंतर एमएमआरडीएतील अधिकारी, त्यांच्या पत्नी आणि मुलाने त्यांना तातडीने हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. मात्र, तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आले. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कपूर हे एमएमआरडीएच्या सेवेत दाखल होण्याआधी पश्चिम रेल्वे येथे कार्यरत होते. २ जुला २०१९ पासून ते एमएमआरडीएमध्ये कार्यरत होते. बीकेसी पोलीस स्टेशनकड़ून या घटनेचा तपास सुरू आहे.

वाचा: सोनू सूदच्या मागे कोण आहे हे भविष्यात कळेलच-राज ठाकरे

घात की अपघात, अद्याप स्पष्ट नाही

कुलवेंद्र कपूर हे चौथ्या मजल्यावरून कोसळले आहेत. त्यांनी उडी मारली की ते अपघाताने कोसळले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेवेळी पत्नी आणि मुलगा घरातच होते. अपघातानंतर त्याना हिंदुजा रुग्णालयात नेण्यात आले पण त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी सायन रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. याप्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे, असे बीकेसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक आनंद मुळये यांनी सांगितले.

वाचा: राज्यात सरकारचे स्टेअरिंग कुणाकडे?; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ उत्तर

राजीव यांनी व्यक्त केला तीव्र शोक

एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी कुलवेंद्र सिंह कपूर यांच्या मृत्यूबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे. कुलवेंद्र यांच्या जाण्याने एमएमआरडीएमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एमएमआरडीए एक परिवाराप्रमाणे या कठीण प्रसंगी कपूर कुटुंबाच्या सोबत आहे. ईश्वर कुलवेंद्र यांच्या आत्म्याला शांती देवो आणि कुटुंबियांना हे दु:ख सहन करण्यासाठी शक्ती देवो हीच प्रार्थना, अशा भावना राजीव यांनी व्यक्त केल्या.

वाचा: चंद्रपुरात करोनाचा पहिला बळी; अमरावतीत १५ दिवस वास्तव्याला होता

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment