Jalgaon मित्राला पोहायला शिकवत होता अन् दोघांच्याही आयुष्याचा ‘दोर’ तुटला

जळगाव:नाल्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन दहावीत शिकणाऱ्या शाळकरी विद्यार्थी मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना जिल्ह्यातीलअमळनेरतालुक्यातीलवाघोदेशिवारामध्ये घडली आहे.भावेश बळीराम देसले(वय १५),हितेश सुनील पवार(वय १५ रा. लोंढवे) अशी मृतांची नावे आहेत. (Jalgaon two student drowns)

वाचा: नागपूरजवळ साखर कारखान्यात स्फोट; ५ कामगार ठार

अमळनेर तालुक्यातील लोंढवे येथील स्व.एस.एस.पाटील माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिकणारे भावेश देसले, हितेश पवार आणि जयवंत सुरेश पाटील हे तिघे मित्र शनिवारी जवळच असलेल्या तुडंब भरुन वाहणाऱ्या नाल्यात पोहण्यासाठी गेले होते. भावेश देसले आणि हितेश पवार हे दोन्ही १५ फूट खोल पाण्यात गेले आणि काही वेळातच ते बुडू लागले. दोन्ही मित्र बुडत असल्याचे पाहून जयंवत घाबरला. त्याने दोघांना वाचवण्यासाठी आरडाओरडा केला. परंतु, जवळ कोणीच नसल्याने मदतीला कोणीही आले नाही. यानंतर त्याने गावात धाव घेऊन दोघे मित्र पाण्यात बुडल्याची माहिती दिली. लगेच भावेश, हितेश यांच्या कुटुबीयांसह ग्रामस्थ त्यांच्या शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब पाटील, सरपंच कैलास खैरनार यांनी घटनास्थळी धाव घेतली. पण तोपर्यंत दोघेही पाण्यात बुडाले होते. नंतर पट्टीच्या पोहणाऱ्यांनी नाल्यातून दोघांचे मृतदेह बाहेर काढले. दोघांच्या कुटुंबीयांनी प्रचंड आक्रोश केला होता.

वाचा: चंद्रपुरात करोनाचा पहिला बळी; अमरावतीत १५ दिवस वास्तव्याला होता

दोर तुटल्याने घडली दुर्घटना

तिघांपैकी भावेश याला चांगले पोहता येत होते. परंतु मित्र हितेश याला पोहता येत नसल्याने त्याला दोर बांधून भावेश पोहायला शिकवत होता. जयवंत हा काठावरच होता. काही वेळात हितेशला बांधलेला दोर तुटला. त्यामुळे भावेशने त्याला वाचवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. हितेश अधिक खोल पाण्यात गेल्याने त्याचा दम सुटून तो बुडाला. पोहता येत असूनही भावेशही पाण्यात बुडाला आणि दोन्ही मित्रांचा करुण अंत झाला. भावेश आणि हितेश या दोन्ही मित्रांचे वडील शेतकरी असून त्यांची घरची परिस्थिती सर्वसामान्य आहे. भावेश हा एकुलता एक मुलगा होता. तसेच त्याला एक बहीण आहे. तर हितेश हे तीन भाऊ असून तो घरात सर्वात मोठा होता. यामुळे या दोन्ही कुटुंबीयांवर मोठा आघात झाला आहे. दरम्यान, शोकाकूल वातावरणात दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

महापौरांवर कोसळला दु:खाचा डोंगर; मोठ्या भावाचे करोनाने निधन

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment