Aurangabad: विहिरीत आढळला तरुणाचा मृतदेह; आत्महत्या की घातपात?

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Oct 2020, 01:34:00 PM

फुलंब्री: वानेगाव (ता. फुलंब्री) येथे एका ३२ वर्षीय तरुणाचामृतदेहगिरिजा नदीकाठी असलेल्या विहिरीत आढळला आहे. ही घटना सोमवारी (२६ ऑक्टोबर) सकाळी ११च्या सुमारास उघडकीस आली असून, याबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.

किरण प्रकाश निकम असे विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, किरण निकम शनिवार (२४ ऑक्टोबर) सायंकाळी चारपासून बेपत्ता होता. घरातील व्यक्तींनी त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु तो कोठेच आढळून आला नाही. सोमवारी सकाळी ११च्या सुमारास गिरिजा नदी परिसरातील ग्रामपंचायतच्या नवीन पाणीपुरवठा विहिरीजवळ त्याचे कपडे आढळून आले. त्याच्या नातेवाईकांनी विहिरीत गळ सोडला असता किरणचा मृतदेह पाण्यातून वरती आला.

या घटनेचे माहिती फुलंब्री पोलिसांना दिली असता घटनास्थळी पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे, पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत नांदवे यांनी धाव घेऊन महात्मा फुले रुग्णवाहिका चालक विजय देवमाळी यांच्यामार्फत मृतदेह फुलंब्री ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. किरण याने आत्महत्या केली आहे की त्याचा घातपात, याबाबत आणखी काही उलगडा होऊ शकला नाही. या घटनेबाबत फुलंब्री पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, याबाबत पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बाबासाहेब कांबळे हे करीत आहे.

पुणे: बहिणीने प्रेमविवाह केला; चिडलेल्या भावानं तलवारी नाचवल्या, वाहनांची तोडफोड

पार्टी केल्यानंतर हाणामारी झाली, मित्रानेच केला मॉन्टी सिंहचा खून

करोनाची पु्न्हा बाधा होण्याचा धोका; अॅण्टीबॉडीबाबत मोठा दावा!

नागपूरमध्ये मोठी कारवाई; लाखोंचे एमडी जप्त

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

सांगलीत चोरट्यांचा धुमाकूळ; एकाच दिवशी वाहनचोरीसह लुटमारीच्या ८ घटना महत्तवाचा लेख

Web Title : man body found in well aurangabad phulambri
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

हेही वाचा

 • मुंबईसर्वांसाठी लोकल केव्हापासून?; मध्य रेल्वेकडून आले ‘हे’ महत्त्वाचे उत्तर
 • देशBihar Election Polling Live: संध्याकाळी ६ वाजेपर्यंत झाले ५३.४६ % मतदान
 • क्रिकेट न्यूजऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यापूर्वी बीसीसीआयने केला महेंद्रसिंग धोनीचा सन्मान, चाहत्यांनाही आवडली ‘ही’ गोष्ट
 • टीव्हीचा मामलानताशा स्टॅनकोविकचा एक्स बॉयफ्रेंड बिग बॉसच्या घरात?
 • आयपीएलIPL 2020: मुंबईचा सूर्यकुमार तळपला, आरसीबीवर मिळवला सोपा विजय
 • आयपीएलIPL 2020: बुम बुम बुमराचा भेदक मारा, बळींच्या शतकासह आरसीबीच्या धावसंख्येला घातले वेसण
 • देशगडकरी जाहीर कार्यक्रमात भ्रष्ट अधिकाऱ्यांवर संतापले, म्हणाले…
 • अहमदनगरशिवसेनेची ताकद कमी होतेय? शिवसैनिकांनी मुख्यमंत्र्यांना सुचवला ‘हा’ पर्याय
 • विज्ञान-तंत्रज्ञानमेक इन इंडियाः ४० इंचाचा स्मार्ट LED टीव्ही लाँच, किंमत १८,९९९ ₹
 • मोबाइलनोकिया स्मार्टफोनची कमाल; सॅमसंग, वनप्लस, शाओमी, ओप्पो, विवोला मागे टाकले
 • वास्तूधनाची दिशा कोणती? कोषवृद्धीसाठी ‘या’ ५ गोष्टी उपयुक्त; व्हाल मालामाल
 • ब्युटीपहिल्या प्रेग्नेंसीनंतर करीना केसगळतीमुळे होती त्रस्त, ऋजुता दिवेकरने सांगितले ‘हे’ उपाय
 • कार-बाइकतयार आहात ना?, या जबरदस्त कारची भारतात होणार आहे एन्ट्री

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment