मुंबईतील धारावीत २५ नवे रुग्ण, बाधितांची संख्या ३६९ वर

मुंबई: आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्याधारावीत करोनाविषाणूचा प्रादुर्भाव वाढतच आहे. दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. आज दिवसभरात २५ नवे बाधित सापडले आहेत. त्यामुळं धारावीतील रुग्णसंख्या ३६९ वर पोहोचली आहे.

धारावीतील करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत आहे. आज २५ नव्या रुग्णांची भर पडली आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये १८ पुरुष, तर ७ महिलांचा समावेश आहे. शिवशक्ती नगर, आझाद नगर, कल्याणवाडी, ९० रोड, पिवळा बंगलो, ढोरवाडा, कुंभारवाडा, लेबर कॅम्प, कुंची कुर्वे नगर, ट्रान्झिट कॅम्प, शास्त्री नगर, पीएमजीपी कॉलनी, इंदिरा नगर, ६० रोड, सोशल नगर, चौगुले चाळ, मुस्लिम नगरात हे नवीन रुग्ण आढळले आहेत. धारावीतील एकूण रुग्णांची संख्या ३६९ झाली आहे, तर आतापर्यंत १८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

माहिममध्ये २ रुग्ण

माहिममध्ये आज दिवसभरात २ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यात ५० वर्षीय महिला आणि ३२ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. हे दोघे नया नगर, आणि कॅडल रोड येथील आहेत. माहिममधील एकूण करोनाबाधितांची संख्या ३५वर पोहोचली आहे. दरम्यान, दादरमध्ये आज दिवसभरात एकही करोनाबाधित रुग्ण सापडला नाही. ही दिलासादायक बाब आहे.

धक्कादायक! मालेगावात योद्ध्यांना करोनाचा विळखा; ४२ पोलीस बाधित, चिंता वाढली

करोनाबाधित पत्रकाराच्या संपर्कात, चार मंत्री ‘सेल्फ क्वारंटाईन’

करोनाचा वाढता धोका; नागपूर कारागृहही झाले लॉकडाऊन

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment