मुंबईकरांची चिंता वाढली; धारावी आणि माहीममध्ये चार रुग्ण सापडले

मुंबईकरांची चिंता वाढली; धारावी आणि माहीममध्ये चार रुग्ण सापडले

मुंबई:मुंबईकरांच्या चिंतेत भर टाकणारी बातमी आहे. धारावीत आजही करोनाचे दोन रुग्ण आढळले असून धारावीतील करोना रुग्णांची संख्या ९वर गेली आहे. तर धारावीपाठोपाठ माहीममध्ये पहिल्यांदाच करोनाचे दोन रुग्ण सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. धारावीत दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत असतानाच धारावीच्या बाजूलाच असलेल्या माहीममध्येही करोनाचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेसमोरील आव्हान वाढलं आहे.

धारावीतील धनवाडा चाळीमध्ये एका ३५ वर्षीय व्यक्तीला आणि मुकुंद नगर येथील २५ वर्षीय तरुणाला करोनाची लागण झाली आहे. मुकुंद नगरमध्ये करोनाची लागण झालेल्या या तरुणाच्या वडिलांनाही करोनाची लागण झालेली आहे. वडिलांच्या संपर्कात आल्याने त्यालाही लागण झाली आहे. तर धनवाडा येथील व्यक्ती कुणाच्या संपर्कात आला होता आणि त्याच्या संपर्कात कोण कोण आले होते, याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, मुकुंदनगर परिसर या आधीच सील करण्यात आला असून धनवाडा परिसरही सील करण्यात आला आहे. तसेच आज सापडलेल्या दोन्ही रुग्णांच्या कुटुंबीयांना होम क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. दरम्यान, धारावीतील करोनाग्रस्तांची संख्या ९वर गेली असून धारावीच्या डॉ. बलिगा नगरमध्ये सर्वाधिक चार रुग्ण सापडले आहेत. तर मुकुंदनगरमधील रुग्णांची संख्या दोन झाली असून वैभव अपार्टमेंट आणि धनवाडा येथे प्रत्येकी एक रुग्ण सापडला आहे.

मुंबई: वरळीत करोनाचे सर्वाधिक ७८ रुग्ण

धारावीच्याच बाजूला असलेल्या माहीममध्येही करोनाचे दोन रुग्ण सापडले आहेत. माहीमच्या एमएमसी मार्गावरील यूनिक हाइट्समध्ये हा ४३ वर्षीय व्यक्ती राहतो. त्याचं वरळीच्या जिजामाता नगरमध्ये मटनाचं दुकान आहे. सध्या या व्यक्तीला लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. ही व्यक्ती राहत असलेली इमारत सील करण्यात आली असून इमारतीतील सर्वांची तपासणी करण्यात येत आहे. तसेच माहीमच्या विंजेवाडी नर्स हॉस्टेलमध्येही एक रुग्ण आढळला आहे. ब्रीच कँडी रुग्णालयातील नर्स या हॉस्टेलमध्ये राहते. मात्र, नर्सला करोनाची लागण झाली की इतर कुणाला याची माहिती अद्याप मिळालेली नाही.

क्रिकेटपटूकडून करोनासाठी दिले ८० हजार डॉलर!

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment