भयंकर! एकाच कुटुंबातील तिघांची हत्या; पैठण हादरला

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 28 Nov 2020, 11:19:00 AM

औरंगाबाद:औरंगाबादजिल्ह्यातीलपैठणतालुक्यात एकाच कुटुंबातील तीन जणांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात एका ८ वर्षीय मुलीचा समावेश आहे. तर ६ वर्षांचा मुलगा थोडक्यात बचावला असून, जखमी अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पैठण तालुक्यातील जुने कावसन गावात ही घटना घडली आहे. पहाटेच्या सुमारास हे हत्याकांड घडले. अज्ञात हल्लेखोराने घरात घुसून संभाजी निवारे यांच्या कुटुंबावर तीक्ष्ण हत्याराने प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात संभाजी निवारे, त्यांची पत्नी अश्विनी निवारे, ८ वर्षांची मुलगी सायली निवारे यांचा जागीच मृत्यू झाला. या हल्ल्यातून त्यांचा सहा वर्षांचा मुलगा सोहम थोडक्यात बचावला आहे. तो जखमी झाला आहे. त्याला तातडीने औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

संभाजी निवारे यांच्या घरातच हे हत्याकांड घडले. संभाजी निवारे यांच्या जवळच्या नात्यात लग्न होते. शुक्रवारी ते शहरात जाऊन खरेदी करून आले होते. रात्री उशिरा जेवण करून सर्व जण झोपी गेले होते. त्यानंतर आज पहाटे शेजाऱ्याला घराचे दार खुले असल्याचे दिसले. त्याने घरात डोकावून बघितले असता, तिघांचे मृतदेह आढळून आले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केल्यानंतर तिघांचेही मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहेत.

चोरट्यांनी २८ लाखांसह ATM मशीनच पळवले; CCTVमुळे हाती लागली महत्वाची माहिती

औरंगाबाद: आश्रमात घुसून महाराजांवर हल्ला करणारे गजाआड; १४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

घरी आलेल्या ३ मित्रांसोबत सेक्स करण्यासाठी पत्नीवर दबाव, विरोध केल्यानंतर…

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

चोरट्यांनी २८ लाखांसह ATM मशीनच पळवले; CCTVमुळे हाती लागली महत्वाची माहिती महत्तवाचा लेख

Web Title : aurangabad 3 of family member murdered in paithan
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

हेही वाचा

 • गुन्हेगारीमोदी पुण्यात येताच आसाराम बापूच्या सुटकेसाठी घोषणा; तिघे पोलिसांच्या ताब्यात
 • विज्ञान-तंत्रज्ञानस्मार्ट टीव्हीसाठी मोफत सेटटॉप बॉक्स; जबरदस्त ऑफर
 • देशसरकार शेतकऱ्यांशी चर्चेस तयार, सर्व मागण्यांवर विचार करू: अमित शहा
 • सिनेन्यूज’महाराष्ट्र सरकारपेक्षा तर आदित्य पांचोली, हृतिक रोशन बरे’
 • देशओवेसींच्या बालेकिल्ल्यात योगी; ‘जियो रे बाहुबली’, ‘जय श्रीराम’च्या घोषणा
 • न्यूजदेवेंद्र फडणवीसांची मुख्यमंत्र्यावर टीका, महाविकास आघाडीच्या नेत्यांनी दिलं उत्तर
 • क्रिकेट न्यूजIND vs AUS: दुसऱ्या वनडेमध्ये विराट कोहली देऊ शकतो ‘या’ दोन खेळाडूंना पदार्पणाची संधी
 • देशराहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर वार, प्रियांका गांधीही भडकल्या
 • औरंगाबादसंजय राऊत-देवेंद्र फडणवीस भेट; नितेश राणे यांनी घेतली ‘ही’ शंका!
 • फॅशनअनुष्का व मीराने परिधान केले एकसारखेच कपडे? स्टाइलमध्ये कोणी मारली बाजी
 • मोबाइलप्रतिक्षा संपली! या तारखेला भारतात रिलाँच होऊ शकतो पबजी मोबाइल
 • मोबाइल२ सेल्फीचा इनफिनिक्सचा नवा स्मार्टफोन ३ डिसेंबरला भारतात लाँच होणार
 • मोबाइलAirtel ग्राहकांना फ्री मध्ये मिळतोय 5GB डेटा, डाउनलोड करा Airtel Thanks App
 • प्रेरक कथा’असे’ पटवून दिले रामदास स्वामींनी क्षात्रधर्म साधनेचे महत्त्व; वाचा

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment