नागपूर: शवविच्छेदनगृहातून मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास, नर्सवर संशय

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 25 Nov 2020, 01:42:00 PM

म.टा. प्रतिनिधी,नागपूर: शवविच्छेदनगृहातून मृत महिलेच्या अंगावरील दागिने लंपास करण्यात आले. मृतकाच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा हा धक्कादायक प्रकार मेयो हॉस्पिटलमध्ये उघडकीस आला. याप्रकरणी तहसील पोलिसांनी अज्ञात चोराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एका परिचारिकेवर पोलिसांचा संशय आहे. लवकरच तिला चौकशीसाठी बोलविण्यात येणार असल्याची माहिती तहसील पोलिसांनी दिली.

सागर ज्ञानेश्वर बागडकर (वय ३२ रा. वॉर्ड क्रमांक दोन खापरखेडा) यांच्या आई पुष्पा बागडकर वय ५५ यांची ऑक्टोबर महिन्यात प्रकृती खालावली. सागर यांनी पुष्पा यांना मेयो हॉस्पिटलमधील वॉर्ड क्रमांक ४१मध्ये दाखल केले. उपचारावेळी पुष्पा यांच्या बोटात अंगठी, गळ्यात सोन्याच्या डोरल्यासह ३५ हजार रुपये किमतीचे दागिने होते. १६ ऑक्टोबरला उपचारादरम्यान पुष्पा यांचा मृत्यू झाला. शवविच्छेदनासाठी त्यांच्या मृतदेह शवविच्छेदनगृहात ठेवण्यात आला. यादरम्यान अज्ञात चोरट्याने मृतदेहाच्या अंगावरील दागिने चोरी केले. ही बाब सागर यांच्या लक्षात आली. त्यांनी तहसील पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी चौकशी करून चोरीचा गुन्हा दाखल केला. पोलिसांनी मेयो हॉस्पिटल प्रशासनाला सीसीटीव्ही फुटेजची मागणी केली. मात्र अद्यापही पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज देण्यात आले नाही. सागर यांनी एका परिचारिकेवर संशय व्यक्त केला आहे. सीसीटीव्ही फुटेच्या तपासणीनंतर तसेच परिचारिकेच्या चौकशीनंतर पुढील कारवाई करण्यात येईल,अशी माहिती तहसील पोलिसांनी दिली.

मोबाइलही पळविला

ऑक्टोबर महिन्यात मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या दोन रूग्णांचे मोबाइलही चोरी गेल्याची माहिती समोर आली आहे. दोन्ही प्रकरणी तहसील पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला. याप्रकरणाचाही आता नव्याने तपास करण्यात येणार आहे.

लॉकडाऊनमुळे रोजगार हिरावला, हतबल बापानं ६ महिन्यांचं बाळ विकलं

क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, आरोपींनी व्हिडिओही शूट केला

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

क्लासला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, आरोपींनी व्हिडिओही शूट केला महत्तवाचा लेख

Web Title : steal jewellery and mobile from dead woman in nagpur hospital
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

हेही वाचा

 • सिनेन्यूजइतकंच असेल त्यानं माझं नाव लावू नये; जानच्या आरोपांमुळे कुमार सानू नाराज
 • विज्ञान-तंत्रज्ञानया कंपनीची मोठी ऑफर; भरघोस ऑफर्ससह सेटटॉप बॉक्स मिळवा फ्री
 • वेब सीरिजसानिया मिर्झाचं अभिनय क्षेत्रात पदार्पण; ‘या’ वेब सीरिजमध्ये झळकणार
 • गुन्हेगारीधक्कादायक! इंजिनीअर तरुणाला खुर्चीला बांधून जिवंत जाळले; पत्नीला अटक
 • देशलालूप्रसाद यादव यांची ‘ती’ ऑडिओ क्लिप सुशील मोदींनी शेयर केली
 • पुणेपुणे: ‘पाटील इस्टेटचा भाई कोण?’ यावरून बालमित्रांमध्ये तुफान राडा
 • क्रिकेट न्यूजपाहा व्हिडिओ: … म्हणून सचिनला ‘मॅन विद गोल्डन आर्म’ असे म्हणतात
 • गुन्हेगारीक्लासला गेलेल्या विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार, आरोपींनी व्हिडिओही शूट केला
 • अर्थवृत्त… म्हणून जेफ बेजोस, अंबानींच्या लढाईत मोदींची प्रतिष्ठा पणाला
 • ब्युटीलांबसडक व घनदाट केसांसाठी ‘या’ आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहेत लाभदायक
 • धार्मिककार्तिकी एकादशीचे व्रत नेमके कधी करावे? पाहा, योग्य तिथी व मुहूर्त
 • मोबाइलOppo Reno 5 सीरीजमध्ये लाँच होणार तीन स्मार्टफोन, समोर आले डिटेल्स
 • मोबाइलकंपनी म्हणतेय Airtel Xstream चा ९९९ रुपयांचा ब्रॉडबँड प्लान बेस्ट, पाहा डिटेल
 • मोबाइलसॅमसंग Galaxy A02S आणि Galaxy A12 लाँच, पाहा किंमत-फीचर्स

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment