नगर: विदेशी नागरिकांच्या संपर्कातील तिघांना करोना

अहमदनगर: जिल्ह्यात करोनाचे आणखी तीन रुग्ण सापडले आहेत. हे तिघेहीयेथील आहेत. ते ‘करोना’ची लागण झालेल्या विदेशी व्यक्तींच्या संपर्कात आले होते,’ अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत ‘करोना’ची लागण झालेल्या रुग्णांची संख्या आठ झाली असून त्यामधील एका रुग्णाची चौदा दिवसानंतरची चाचणी निगेटिव्ह आली आहे. त्यामुळे त्या रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला आहे. रविवारी (२९ मार्च) नगरमध्ये सध्या वास्तव्यास असलेल्या दोन विदेशी नागरिकांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यामधील एक व्यक्ती फ्रान्स, तर दुसरा आयव्हरी कोस्टचा आहे. या दोघांचे नगर शहरासह जामखेड येथे वास्तव होते. त्यामुळे या दोघांच्या संपर्कात आलेल्या या परिसरातील व्यक्तींची माहिती घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे. या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या जवळपास ४९ व्यक्तींचे स्त्राव नमुने सोमवारी आरोग्य विभागाने पुण्याला पाठवले होते. त्यापैकी आज दुपारी २८ जणांचे अहवाल प्राप्त झाले असून, तीन जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हे तिघेही जामखेड येथील रहिवासी असून, त्यांना ‘करोना’ची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या तिघांना करोनाबाधित व्यक्तींच्या संपर्कात आल्याने करोनाची लागण झाल्यामुळे जिल्हा प्रशासन अधिकच सतर्क झाले आहे. आता या तिघांच्या संपर्कात असणाऱ्यांना ताब्यात घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. तसेच नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे.

बिंबिसार नगरमध्ये करोनाचा रुग्ण; नागरिकांना प्रवेशबंदी

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment