धक्कादायक! अंगावरील कपडे उतरवून तरुणाला बेल्टने मारहाण; व्हिडिओही काढला

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

टीम मटा ऑनलाइन | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 27 Nov 2020, 03:54:00 PM

म. टा. प्रतिनिधी, पुणे: कर्जाची रक्कम परत न केल्याने तरुणाच्या अंगावरील कपडे उतरवून त्याला पट्ट्यानेमारहाणकेली. त्या मारहाणीचा व्हिडीओ काढून पैसे न दिल्यास व्हायरल करण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार विमाननगर परिसरात घडला. या प्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विकास शहाजी कांबळे (वय ३६, रा. उत्तेश्वर नगर, लोहगाव) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार अविनाश कांबळे (रा. टिंगरे नगर) व इतर दोन अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार विकास व आरोपी अविनाश हे ओळखीचे आहेत. विकास यांनी अविनाश याच्याकडून काही रक्कम कर्ज स्वरूपात घेतली होती. आरोपी हा विकास यांच्याकडे कर्ज व व्याजाची रक्कम मागत होता. तक्रारदार हे त्यांना थांबण्यास सांगत होते. त्यामुळे आरोपी त्यांच्या कामाच्या ठिकाणी गेला. त्या ठिकाणी त्यांना शिवीगाळ करून जबरदस्तीने कळसगांव येथील एका टाऊनशीप येथे घेऊन गेला.

तेथे गेल्यानंतर आरोपींनी विकास यांना अंगावरील सर्व कपडे काढण्यास सांगितले. कपडे काढल्यानंतर आरोपींनी त्यांना पट्ट्याने जबर मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ काढला. पैसे न दिल्यास व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. आरोपींनी सोडल्यानंतर तक्रारदार यांनी पोलिसांकडे धाव घेतली आणि त्यांच्याविरोधात तक्रार केली. या घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील आरोपींचा शोध सुरू आहे. येरवडा पोलीस अधिक तपास करत आहेत.

राज्यात जळगाव, औरंगाबादमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे छापे; काय आहे प्रकरण?

३ वर्षे पगार थकवल्याने नोकरी सोडली; मालकाने अपहरण करून ३ दिवस डांबले

औरंगाबाद: रिक्षा चालकाची मुजोरी; पोलिसाला नेले फरफटत

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

राज्यात जळगाव, औरंगाबादमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे छापे; काय आहे प्रकरण? महत्तवाचा लेख

Web Title : 36 year old man abducted and beaten by belt in viman nagar pune
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

हेही वाचा

 • क्रिकेट न्यूजIND vs AUS : स्टीव्ह स्मिथकडून भारतीय गोलंदाजांची धुलाई; केला हा विक्रम
 • विज्ञान-तंत्रज्ञानस्मार्ट टीव्ही ग्राहकांसाठी खुशखबर! या कंपनीकडून मोफत सेट-टॉपची ऑफर
 • क्रिकेट न्यूजAUS vs IND: रोहित शर्माच्या जागेवर हक्क सांगणारे तिन्ही फलंदाज पहिल्याच सामन्यात झाले फेल
 • मुंबईसंविधानाला स्मरून घेतलेली शपथ गहाण ठेवली का? देवेंद्र फडणवीस
 • गुन्हेगारीराज्यात जळगाव, औरंगाबादमध्ये आर्थिक गुन्हे शाखेचे छापे; काय आहे प्रकरण?
 • अहमदनगर’मुख्यमंत्र्यांची भाषा जनतेमध्ये भीती निर्माण करणारी’
 • मुंबईउद्धव ठाकरे म्हणाले, स्टिअरिंगपण माझ्या हातात आहे!
 • मुंबईलहान मुलांसह प्रवास करणाऱ्या महिलांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय
 • सिनेन्यूजप्रणित हाटे ते ‘कारभारी लय भारी’ मालिकेतील गंगा…एक संघर्षमय प्रवास
 • ब्युटीहिवाळ्यात शरीराचा मसाज केल्यानं मिळतात हे ५ मोठे आरोग्यदायी लाभ
 • मोबाइलAirtel देत आहे ६ जीबी डेटा फ्री, जाणून घ्या डिटेल्स
 • विज्ञान-तंत्रज्ञानRedmi ची पहिली स्मार्ट वॉच लाँच, जाणून घ्या किंमत-फीचर्स
 • बातम्याकार्तिक पौर्णिमा कधी आहे? वाचा, महत्त्व, मान्यता आणि परंपरा
 • मोबाइलमस्तच! WhatsApp वर आता मेसेज शेड्यूल करा, या सोप्या टिप्स पाहा

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment