‘चंगूमंगूच्या फालतू गप्पांमध्ये आम्हाला इंटरेस्ट नाही’

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

Ganesh Pandurang Kadam | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 26 Nov 2020, 04:25:00 PM

मुंबई:शिवसेनेचं मुखपत्र ‘सामना’मध्ये उद्या प्रसिद्ध होत असलेल्या मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेयांच्या मुलाखतीची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे. माजी खासदारनीलेश राणेयांनी मात्र या मुलाखतीवरून पुन्हा एकदा उद्धव ठाकरे व शिवसेनेचे खासदारसंजय राऊतयांच्यावर निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला या महिन्यात एक वर्ष पूर्ण होत आहे. त्या निमित्तानं संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची ‘अभिनंदन’ मुलाखत घेतली आहे. राऊत यांनी मुलाखतीचे प्रोमो देखील सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ‘उद्या धमाका’ असं त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

वाचा: मुख्यमंत्रिपदाचा योग कधी? अजित पवारांनी दिलं ‘हे’ उत्तर

शिवसेनेवर टीका करण्यासाठी संधीच्या शोधात असणाऱ्या नीलेश राणे यांनी या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे. ‘ज्या मुलाखतीतून आणि ज्या व्यक्तींकडून महाराष्ट्राला काही मिळत नाही अशा फुकट्या लोकांना बघायला आम्हाला काही इंटरेस्ट नाही. चंगू मंगूच्या फालतू गप्पा,’ असं ट्वीट नीलेश राणे यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी ‘सामना’ला दिलेली ही दुसरी मुलाखत आहे. त्यांच्या या आधीच्या मुलाखतीनंतर सत्ताधारी व विरोधकांमध्ये शाब्दिक युद्ध रंगले होते. ताज्या मुलाखतीतही त्यांनी मागील काही दिवसांतील घडामोडींवर भाष्य केल्याचं प्रोमोतून दिसत आहे. केंद्र सरकार ईडी व सीबीआयच्या माध्यमातून करत असलेली कारवाई असो, सरकार पाडण्याची भाकितं असो वा करोनाच्या निमित्तानं होणारं राजकारण असो, सगळ्या प्रश्नांची उत्तरं उद्धव यांनी दिली आहेत. त्यामुळं या मुलाखतीबद्दल राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

वाचा: आव्हान मिळालं की मला जास्त स्फूर्ती मिळते; ठाकरेंचा रोख कुणाकडे?

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

दिशाच्या मृत्यूचा तपास सीबीआयकडे द्यावा; मुंबई हायकोर्टाने दिले ‘हे’ उत्तर महत्तवाचा लेख

Web Title : former mp nilesh rane taunt uddhav thackeray and sanjay raut over upcoming interview
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

हेही वाचा

 • क्रिकेट न्यूजअजिंक्य रहाणे सराव करत होता; शिखर म्हणाला, काय फायदा…
 • विज्ञान-तंत्रज्ञानस्मार्ट टीव्ही ग्राहकांसाठी खुशखबर! या कंपनीकडून मोफत सेट-टॉपची ऑफर
 • देशअडचणीत भर; शिक्षा भोगणाऱ्या लालूंविरोधात पोलिसांत तक्रार दाखल
 • मुंबईविजय साळसकरांना दुसऱ्यांदा फोन केला, तेव्हा… मुख्यमंत्री झाले भावुक
 • देशनेत्यांच्या भडकाऊ भाषणांवर पोलिसांची नजर, कारवाईचा इशारा
 • विदेश वृत्तकरोना: ऑक्सफर्ड लस चाचणीत एक चूक ठरली वरदान;अनेक शंका उपस्थित
 • गुन्हेगारीधक्कादायक! तरुणीचे मामाच्या गावातून अपहरण; १४ दिवस बलात्कार
 • न्यूजकाँग्रेस नेते अहमद पटेल यांना अखेरचा निरोप
 • गुन्हेगारीमध्यरात्री महिला मुंबई लोकलमधून प्रवास करत होती, इतक्यात ‘तो’ डब्यात घुसला अन्…
 • मोबाइलऑफलाइन राहून Whatsapp वर करा चॅटिंग, कुणालाच दिसणार नाही ऑनलाइन
 • मोबाइलTwitter ला टक्कर देण्यासाठी आले स्वदेशी Tooter, लोकांनी ‘अशी’ उडवली खिल्ली
 • धार्मिकबुधचे राशीपरिवर्तन : ‘या’ ५ राशींना काहीसा कष्टकारक कालावधी; वाचा
 • प्रेग्नंसी/पेरेंटिंगमुलांना सतत लघुशंका होणं असू शकतात ‘या’ गंभीर आजाराची लक्षणे, काय काळजी घ्यावी?
 • फॅशनप्रसिद्ध अभिनेत्री असतानाही दीपिकाने करीनाची स्टाइल केली कॉपी? फोटो व्हायरल

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment