गुडन्यूज! या दिवशी महाराष्ट्रात धडकणार मान्सून

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

Mansi Kshirsagar | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 08 Jun 2020, 02:54:00 PM

monsoon-in-Maharashtra

मुंबईःराज्यात करोनाचे संकट व निसर्ग चक्रीवादळामुळं झालेलं नुकसान असं दुहेरी संकट ओढावलेलं असतानाच राज्यासाठी एक दिलासादायक बातमी समोर येतेय. येत्या दोन- तीन दिवसांतमहाराष्ट्रात मान्सूनधडणार असल्याची शक्यता हवामान विभागनं व्यक्त केली आहे.

बंगालच्या खाडीत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं राज्यात ९ ते ११ जून दरम्यान मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच, येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये मोसमी वारे कर्नाटक व गोवा ओलांडून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केलंय.

…तर मी संजय राऊतांचे पाय धरेन; मनसेच्या नेत्याचा व्हिडिओ व्हायरल

मोसमी वारे सध्या गोव्याजवळ कर्नाटकातील कारवारपर्यंत दाखल झाले आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये कर्नाटकातील काही भाग व तामिळनाडूतील काही भागांत मोसमी वाऱ्यांनी प्रगती केली आहे. पोषक वातावरणामुळं पुढील दोन ते तीन दिवसांत तळकोकणातून मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता आहे.

धारावीत करोनाचा विळखा सैल; आठवड्याभरात एकही मृत्यू नाही

सरासरीइतका पाऊस

यंदा जून ते सप्टेंबर या मान्सून काळातील सरासरीच्या १०२ टक्के पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) आपल्या सुधारीत अंदाजात वर्तवली आहे. मान्सूनसाठी संपूर्ण हंगामात हवामान अनुकूल राहणार असल्यामुळे सरासरीइतक्या पावसाची शक्यता असल्याचे अंदाजात म्हटले आहे. वायव्य भारतात यंदा त्या भागातील हंगामी सरासरीच्या १०७ टक्के, महाराष्ट्राचा समावेश असणाऱ्या मध्य भारतात सरासरीच्या १०३ टक्के, दक्षिण भारतात १०२ टक्के, तर ईशान्य भारतात ९६ टक्के पावसाची शक्यता आहे.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

…तेव्हा मला फडणवीसांचा फोन आला होता: अशोक चव्हाणमहत्तवाचा लेख

Web Title : the arrival date for monsoon in maharashtra around june 10
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

हेही वाचा

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment