कोल्हापूर: कोविड सेंटरमधील करोनाबाधित महिलेचे दागिने चोरले

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

  • Marathi News
  • crime news
  • corona patient woman gold jewellery stolen by theft at covid 19 center in kolhapur

Nandkumar Joshi | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 17 Sep 2020, 03:20:00 PM

म. टा. प्रतिनिधी,कोल्हापूर: करोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्या एका महिलेच्या अंगावरील सात तोळे सोन्याच्या दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. शहरातील महाराणा प्रताप चौकातील एका कोविड सेंटरमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या महिन्यात घडलेली ही दुसरी घटना आहे.

कदमवाडी येथे राहत असलेल्या एका महिलेचा करोना तपासणी अहवाल काही दिवसांपूर्वी पॉझिटिव्ह आला. त्यानंतर तिला उपचारासाठी नातेवाईकांनी महाराणा प्रताप चौकातील केपीसी या कोविड सेंटरमध्ये दाखल केले. दोन-तीन दिवसांनंतर तिची प्रकृती आणखी बिघडली. त्यामुळे तिला तेथील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले. बुधवारी रात्री उशिरा तिच्या अंगावरील दागिन्यांवर चोरट्याने डल्ला मारला. त्यामध्ये चार तोळ्याच्या पाटल्या, दोन तोळ्याचे मंगळसूत्र, आठ ग्रॅमची कानातील फुले व दोन ग्रॅमच्या बुगड्या असे सात तोळ्यांचे हे दागिने होते. या प्रकरणी अडीच लाखांचे दागिने चोरीस गेल्याची फिर्याद नातेवाईकांनी लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दिली आहे.

काही दिवसांपूर्वी करोनाचे उपचार घेताना एका महिलेचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्यानंतर मृतदेहावरील दागिने चोरट्यांनी लंपास केले. या प्रकरणाचा अजूनही तपास लागला नाही. काही कोविड सेंटर व रूग्णालयात मोबाइलसह किंमती साहित्य चोरीस जात आहे. यामुळे उपचारास दाखल होणाऱ्या रुग्णाच्या नातेवाईकांच्या चिंतेत आणखी भर पडली आहे.

आणखी बातम्या वाचा:

पुणे: पोलीस ठाण्यातच कॉन्स्टेबल आणि शिपाई भिडले, फाईलवरून हाणामारी

मुंबई: हॉस्पिटलमध्ये नाइट शिफ्टसाठी जाताना नर्सचा धावत्या ट्रेनमध्ये विनयभंग

मुंबई: करोनाबाधित अल्पवयीन मुलीचा क्वारंटाइन सेंटरमध्ये विनयभंग

कोविड सेंटरमध्ये तरुणीवर बाऊन्सरने केला सलग ३ दिवस बलात्कार

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

ऑनर किलिंग: मुलगी बॉयफ्रेंडला मध्यरात्री भेटायला गेली, वडिलांनी दोघांवर घातले कुऱ्हाडीचे घाव महत्तवाचा लेख

Web Title : corona patient woman gold jewellery stolen by theft at covid 19 center in kolhapur
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

हेही वाचा

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment