करोना: दूध उत्पादकांसाठी सरकारचा ‘लाख’मोलाचा निर्णय

Ganesh Pandurang Kadam | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated:Mar 31, 2020, 04:17PM IST

करोना: दूध उत्पादकांसाठी सरकारचा ‘लाख’मोलाचा निर्णय

मुंबई:‘करोना’ संकटाच्या पार्श्वभूमीवर दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकार शेतकऱ्यांकडून दररोज दहा लाख लिटर दूधाची २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी करणार आहे. येत्या चार-पाच दिवसात हे संकलन सुरू होणार असून ‘करोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरू राहणार आहे.
उपमुख्यमंत्रीअजित पवारयांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. ‘करोना’ प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय, दूध उत्पादक शेतकरी संकटात आहे. दूधविक्री घटल्यामुळे गावागावात दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित १२ लाख लिटर दूधापैकी १० हजार लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खासगी बाजारात दूधाचा दर १५ ते १७ रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच ‘करोना’च्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले १० लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून २५ रुपये प्रतिलिटर दराने खरेदी केले जाणार आहे. त्या दुधाची भूकटी करून ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला.

डॉक्टरची लपवाछपवी; नवी मुंबईत रुग्णालय सील

राज्य दूध महासंघाच्या माध्यमातून ही योजना राबवण्यात येणार असून यातून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळेल. यासाठी साधारणपणे २०० कोटी रुपये निधी लागेल, असे अजित पवार यांनी सांगितले.

करोना Live: लतादीदींकडून २५ लाखांची मदत

उपमुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, दुग्धविकास मंत्री सुनील केदार (दूरध्वनीद्वारे), वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, दूध महासंघाचे व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

ही तर पंतप्रधान मोदींची बदनामी; शिवसेनेचा भाजपला टोला

Source

Spread the love

Related posts

Leave a Comment