करोनामुळं अनेक वर्षांची परंपरा खंडित; कोल्हापुरातील शाही दसरा सोहळा रद्द

हॅलो, तुम्ही मटा IE11 व्हर्जनमध्ये पाहत असल्याचं दिसतं. मटा ही वेबसाइट ऑप्टिमाईज करण्यात आली असून एज आणि क्रोम ब्राऊजरमध्ये सर्वोत्तम चालते. कृपया तुमचं ब्राऊजर अपडेट करा.

गुरुबाळ माळी | महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: 19 Oct 2020, 08:01:00 PM

म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः करवीर संस्थानच्या राजघराण्याच्या वतीने दरवर्षी विजया दशमी दिवशी होणारा शाही सीमोल्लंघन सोहळा यंदा रद्द करण्यात आला आहे.करोनासंसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात दरवर्षी शाही दसरा सोहळा होतो. या सोहळ्यास अंबाबाई, तुळजाभवानी व गुरू महाराज पालखीसह छत्रपती घराण्यातील सर्वजण शाही गणवेश परिधान करून मेबॅक या गाडीतून लवाजम्यासह चौकात येतात. तेथे मोठ्या गर्दीच्या उपस्थितीत सोने लुटण्याचा पारंपारिक कार्यक्रम होतो. म्हैसूर आणि करवीर या दोन संस्थानच्या वतीने होणारा हा सोहळा गेले अनेक वर्षे सुरू आहे.

राज्यातून काँग्रेसची ‘फौज’ही बिहारला जाणार; ‘हे’ मुद्दे गाजणार?

यंदा करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अंबाबाई मंदिर बंद आहे. धार्मिक विधी सुरू असले तरी भाविकांना उपस्थित राहण्यास मनाई करण्यात आली आहे. रात्री निघणारी पालखी मोजक्या भाविकांच्या उपस्थितीत काढली जाते. गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने अनेक निर्णय घेतले आहेत. यानुसार श्रीमंत शाहू महाराज छत्रपती यांनी सोमवारी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर शाही सीमोल्लंघन सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यामुळे अनेक वर्षानंतर प्रथम हा सोहळा खंडित होणार आहे.

फरक, जमिनीचा व हवेचा; फोटो ट्वीट करत काँग्रेस नेत्याचा फडणवीसांना टोला

करोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेचे आरोग्य अतिशय महत्त्वाचे आहे. यामुळे यंदाचा शाही सीमोल्लंघन होणार नसल्याने करवीरकरांनी मनातून आनंद घ्यायचा आहे. पुढील वर्षी हा सोहळा अधिक उत्साहाने साजरा करण्यात येईल.

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

ताज्या बातम्यांसह अपडेट राहण्यासाठी लाइक करा Maharashtra Timesफेसबुक पेज

मराठा आरक्षणासाठी घटनेत बदल? संभाजीराजेंनी केला खुलासा महत्तवाचा लेख

Web Title : the kolhapur royal family dussehra celebration cancelled due to covid-19
Marathi News from Maharashtra Times, TIL Network
Follow Maharashtra Times to get today’s Latest Marathi News and current Marathi News Headlines from India and around the world. Find all breaking events from Maharashtra, India, business, technology and world.

हेही वाचा

 • मुंबईउत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लावा!; राज्यातील ‘या’ मंत्र्याचे राज्यपालांना पत्र
 • मोबाइलSamsung Galaxy F41 चा सेल अखेर सुरू! Big Billion Day Sale मध्ये बेस्ट मिड रेंज फोन खरेदीची संधी
 • नागपूरकरोनाच्या दुसऱ्याचा लाटेचा धोका; आरोग्य यंत्रणा ‘अशी’ होतेय सज्ज
 • अहमदनगर’मंत्री, नेत्यांचे इतरत्र पाहणी दौरे, नगर जिल्ह्यात शेतकरी नाहीत का?’
 • आयपीएलIPL 2020: चेन्नईला ‘या’ मोठ्या चुका भोवल्या आणि मानहानीकारक पराभव पत्करावा लागला
 • देश’हैदराबादमध्ये १०० वर्षांत असा पाऊस पडला नाही’, CM नी केली मोठी घोषणा
 • देशमदत मागणाऱ्यावर वरुण गांधी खवळले!; म्हणाले, ‘मी काय तुमचा नोकर नाही’
 • नागपूरकाय सांगता? पोलिस स्टेशनसमोरचा जप्त ट्रक घेऊन चोरटा झाला पसार
 • आयपीएलIPL 2020: धोनीच्या चेन्नईची हाराकिरी, राजस्थानने साकारला मोठा विजय
 • ब्युटीकेसांच्या वाढीसाठी रामबाण उपाय, या क्रमाने हेअर प्रोडक्ट्सचा करा वापर
 • मोबाइलVi ग्राहकांना आता अनलिमिटेड प्रीपेड पॅकमध्ये मिळणार ‘ही’ सुविधा
 • पोटपूजास्वादिष्ट मालपुवा रेसिपी!
 • आजचं भविष्यचंद्राचा वृश्चिक प्रवेश : ‘या’ ९ राशींना भाग्याचा दिवस; आजचे राशीभविष्य
 • मोबाइलवायरविना १९ मिनिटात चार्ज होणार स्मार्टफोन, लाँच झाली जबरदस्त टेक्नोलॉजी

धन्यवाद

Subscribe Us On
Source

Spread the love

Related posts

Leave a Comment